Ad will apear here
Next
डॉक्टर रुग्ण संबंधांवर रत्नागिरीत व्याख्यान
ग्राहक पंचायतीचा उपक्रम
रत्नागिरी : येथील ग्राहक पंचायतीतर्फे ‘सर्वांसाठी आरोग्य आणि डॉक्टर रुग्ण संबंध’ या विषयावर पुण्यातील डॉ. अनंत फडके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता झाडगाव नाका येथील माधवराव मुळ्ये भवन येथे होणार आहे.  

डॉ. फडके यांचे ‘सर्वांसाठी आरोग्य? होय शक्य आहे’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून, ते सामाजिक कार्यकर्ते ही आहेत. विचारांमध्ये हलगर्जीपणाचा मुद्दा आणि रुग्ण तकारी, असे विषय अनेकवेळा चर्चिले जातात. या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायतीने या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे.

या व्याख्यानाला जिज्ञासूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. दिलीप भावे, उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, कार्यवाह नंदकुमार जोशी यांनी केले आहे.

व्याख्यानाविषयी :
दिवस :
रविवार, ३० सप्टेंबर २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : माधवराव मुळ्ये भवन, झाडगाव नाका, रत्नागिरी.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZGABS
Similar Posts
मुलांना त्यांच्या क्षमतेची जाणीव पालकांनी करून द्यावी रत्नागिरी : ‘मूल तणावमुक्त राहिले पाहिजे. पालक हेच मुलांचे आदर्श असतात. घरात टीव्ही, मोबाइलचा जास्त वापर पालक करतात. त्यामुळे मुलेसुद्धा त्यात वेळ घालवतात. सामाजिक आरोग्यामध्ये आपले मूल दिव्यांगांना मदत करते का, हे पाहिले पाहिजे. मुलांना आपण काय करू शकतो ही क्षमता ओळखता आली पाहिजे. ती न कळल्यास पालकांनी
रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे विद्यार्थ्यांसाठी २५ ऑगस्टला निबंध स्पर्धा रत्नागिरी : ग्राहक प्रबोधनाच्या हेतूने रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे आठवी ते दहावी आणि अकरावी-बारावी या दोन गटांत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत फाटक हायस्कूल येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
ग्राहक दिनानिमित्त विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धा रत्नागिरी : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त येथील ग्राहक पंचायततर्फे यावर्षी वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी गटासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन विद्यार्थ्यांचा एक संघ एका महाविद्यालयाला पाठवता येईल. ग्राहक चळवळ, ग्राहक संरक्षण कायदा, माहितीचा अधिकार अधिनियम, सेवा हमी कायदा, ग्राहक
कथ्थक नृत्य परीक्षेत रत्नागिरीची पूर्वा जोगळेकर प्रथम रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पटवर्धन संगीत अकादमीतर्फे गेली चार वर्षे पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील नृत्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात. यात कथ्थक नृत्य प्रकारात पूर्वा जोगळेकर हिने प्रथम, तर भरतनाट्यम प्रकारात मीरा खालगावकरने द्वितीय क्रमांक पटकावला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language